धनदाई माता मंदिर, म्हसदी (धुळे) कुलस्वामिनी श्री धनदाई माता : देवी अवताराची कथा मोठी विलक्षण आहे. देवरे कुळातील आज जेथे आदिशक्ती धनदाई देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी म्हणजे नयगावी वास्तव्यास आले . त्यांनी तेथे कुल संरक्षणासाठी धनदाई देवीच्या स्वयंभू मूर्तीची स्थापना केली. नायगावात बरेच वर्ष वास्तव्य केल्यानंतर जंगली प्राण्यांचा उपद्रव, पाण्याची दुर्मिळता तसेच दरोडेखोरांचा त्रास या सर्व गोष्टीना कंटाळून तिथून जवळचा असलेल्या नदीपलीकडील त्याकाळचे म्हीसपाडा म्हणजेच आजचे म्हसदी या ठिकाणी स्थलांतर केले. त्या काळी पूजा करताना देवीच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा होती. पिढ्यानपिढ्या मूर्तीला शेंदूरलावल्यामुळे ती मूर्ती शेंदूरमुले लुप्त झालीव त्या ठिकाणी मूर्ती होती हे पुढील पिढ्यांना लक्ष्यात आले नाही . कालंतराने हे देवस्थान दुर्लक्षित झाले. जंगलात वास्तव्य असणारे भिल्ल त्या देवस्थान चा सांभाळ करू लागले. इसवी सन १९६४ मध्ये धनदाई देवीने दाखविलेल्या चमत्कारामुळे दुर्लक्षित झालेले हे देवस्थान पुन्हा भक्तांच्या नजरेत आले .साक्री येथील पोस्टमास्तर यांची पत्नी सौ .प्रमिला कुलकर्णी यांच्या ...